मुंबईच्या रस्त्यांवर ‘पद्मिनी’चा प्रवास थांबणार 

763

मुंबईच्या रस्त्यावरून पद्मिनी मॉडेलच्या टॅक्सींना येत्या काही काळात अलविदा करण्यात येणार आहे. पद्मिनी या टॅक्सीचा आता अखेरचा प्रवास सुरू झाला आहे. इटालियन फियाट गाडीवरून या गाडीची रचना तयार करण्यात आली होती. पद्मीनीचे या गाडीचे उत्पादन 2000 साली हिंदुस्थानात बंद करण्यात आले होते. मुंबईत आता 50 पेक्षाही कमी पद्मिनी शिल्लक राहिल्या आहेत. ज्या जून 2020 मध्ये बंद करण्यात येणार आहेत.

पद्मिनी ही टॅक्सी ‘फियाट 1100’ या गाडीच्या मॉडेलपासून प्रेरित असून, 1965 साली या गाडीचे नाव बदलून ‘प्रीमियर प्रेसिडेंट’ असे ठेवण्यात आले. पुढे जाऊन 1974 साली या गाडीचे नाव पुन्हा बदलण्यात आले. हिंदुस्थानी राणीच्या नावावर य गाडीचे नाव ‘प्रीमियर पद्मिनी’ असे ठेवण्यात आले. या गाडीने तीन दशकांहून ही अधिक काळ हिंदुस्थानी लोकांच्या मनावर राज्य केले आहे.

पद्मिनी टॅक्सी एकेकाळी मुंबईतल्या रस्त्यांची शान होत्या. मात्र ही टॅक्सी भंगारात काढण्याचा निर्णय रस्ते आणि वाहतूक विभागातर्फे 2013 मध्येच झाला आहे. 20 वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या या टॅक्सींना नवा परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्या टॅक्सींच्या परवान्याची मुदत संपलेली नाही अशाच काही पद्मिनी टॅक्सी मुंबईतल्या रस्त्यांवर अजून धावत आहेत. मात्र त्या लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या