अग्निशमन दलात कोरोनाचा पहिला बळी; 30 जवानांना कोरोनाची लागण

3102

कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाच्या 30 जवानांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये निर्जंतुकीकरण करताना या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. अग्निशमन दलात कोरोनामुळे गेलेला हा पहिला बळी आहे.

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेबरोबरच मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारीही अहोरात्र मेहनत घेत आहेत. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडले आहेत भागांना पालिकेने कंटेनमेंट झोन घोषित केले असून त्याच्या निर्जंतुकीकरणाची जबाबदारी अग्निशमन दलाने उचलली आहे. मुंबईत पूर्वी अडीच हजारांपेक्षा जास्त कंटेनमेंट झोन होते. मात्र, आता ही संख्या 644 वर आली आहे. चाळी, झोपडपट्ट्यां आणि सोसायटीमध्येही निर्जंतुकीकरणाचे काम सुरू असते. सुरक्षेचे सर्व नियम पाळून हे काम केले जाते. मात्र, तरीही अग्निशमन दलाच्या 29 जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला. यात 57 वर्षांच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. गवालिया टॅंक अग्निशमन केंद्रात हा कर्मचारी कार्यरत होता. 24 मे हा जवान जे. जे. रुग्णालयात दाखल झाला आणि काही वेळाने त्याचे निधन झाले. आज सकाळी त्याचा कोरोना रिपोर्ट आल्यानंतर त्याचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे स्पष्ट झाले.

आपली प्रतिक्रिया द्या