
मुंबईत आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना मोठ्या थाटामाट्यात निरोप देण्यात आला. महापालिकेचे कृत्रिम तलाव, चौपाट्यांवर, नैसर्गिक तलावांमध्ये बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6 हजार 34 गणेशमूर्तींचे चौपाटी आणि कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आले. यात 5 हजार 936 घरगुती, 36 सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे चौपाट्यांवर तर कृत्रिम तलावांत 16 सार्वजनिक, 2 हजार 76 घरगुती आणि हरतालिकेचे 62 असे एकूण 2 हजार 120 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.



























































