मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, मोटारसायकलस्वार ठार

मुंबई गोवा महामार्गावर वाशी नाका येथे झालेल्या अपघातात मोटर सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. मुंबई गोवा महामार्गावरून प्रकाश महादू पाटील वय (49) हे सकाळी 9:30 च्या सुमारास जात असताना वाशी नाका येथे त्यांना एका अज्ञात ट्रेलरने पाठीमागून धडक दिली. या धडकेमुळे प्रकाश पाटील फेकले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पेण तालुक्यात गुरुवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे, यामुळेच हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.