लक्ष्मीकांत घोणसे-पाटील, गुहागर
कोकणात गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा दमदार बॅटिंग केली. आज खेड परिसरात पडणार्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला. महामार्गावरील वाहतूक गेल्या एक तासांपासून बंद आहे. बोरघर रस्ता पाण्याखाली गेला आहे, तर जगबुडी नदीला पूर आलेला असल्याने खबरदारी म्हणून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. दापोली, गुहागर, खेडमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर बोरघर येथे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. नवीन रस्त्याच्या भरावाइतकं पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून पावसाचा जोर अद्यापही कायम आहे.



























































