मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम आठवडाभरात, डांबरीकरण, पॅचवर्क सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम आठवडाभरात, डांबरीकरण, पॅचवर्क सुरूमुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम आठवडाभरात सुरू करण्यात येणार आहे तर डांबरीकरण आणि पॅचववर्कचे काम सुरू झाले आहे. मुंबई-गोवा रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी चौपदरीकरणाचे काम करणाऱया कंत्राटदारांची कानउघाडणी केली. त्यावर कशेळी ते चिपळूण-लोटे महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम आठवडाभरात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन कंत्राटदारांनी दिले.

कोकणात मुसळधार पडणाऱया पावसामुळे या महामार्गावरील रत्नागिरी जिह्यातील विविध तालुक्यांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जिह्याच्या पालकमंत्र्यांनी नुकताच जिह्याचा दौरा केला असता त्यांच्या ही गोष्ट निदर्शनाला आली. स्थानिकांनीही या महामार्गावरील खड्डय़ांमुळे होणाऱया त्रासाची माहिती पालकमंत्र्यांना दिली. याची गंभीर दखल घेत त्यांनी सकाळी मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम करणाऱया कंत्राटदारांची बैठक घेतली. या बैठकीला खेडचे प्रांत सोनावणे त्याचबरोबर खेड तसेच चिपळूण येथील कंत्राटदार हजर होते.

गेल्या वर्षभरापासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चार विविध कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले. या कंपन्यांना त्या त्या रस्त्यांचे काम करणाऱया कंत्राटदारांना तेथील रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.