हाजीअलीत कचऱ्यापासून तयार झाली वीज! दररोज दोन मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या ‘डी’ प्रभागातील हाजीअली येथे कचऱयापासून वीजनिर्मिती होणारा मुंबईतील पहिलाच प्रकल्प सुरू झाला आहे. या ठिकाणी दररोज दोन मेट्रिक टन ओल्या कचऱयावर प्रक्रिया होणार असून गोपाळराव खाडय़े मार्ग आणि उद्यानातील दिवे या 300 युनिट विजेने उजळणार आहेत. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.

मुंबईतील कचऱयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून शहर स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. पालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायटय़ांना कचऱयाचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱया इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱयाच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये आता कचऱयापासून वीजनिर्मितीसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. देवनार डंपिंग ग्राऊंडवरदेखील असा वीज प्रकल्प प्रस्तावित आहे. तर ‘डी’ विभागात आता 2 मेट्रिक टन ओल्या कचऱयापासून 300 युनिट वीजनिर्मिती सुरू करण्यात आल्याचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, आमदार रईस शेख, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, उपायुक्त विजय बालमवार, घन कचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अशोक यमगर, एरो केअर या सेवा पुरवठादार कंपनीचे अंकित जव्हेरी आदी उपस्थित होते.

असा आहे प्रकल्प

  • हाजीअली चौकाजवळ केशवराव खाडय़े मार्गाजवळ दीड हजार चौरस फुटांच्या जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ‘डी’ विभागात निर्माण होणाऱया 200 मेट्रिक टन ओला-सुक्या कचऱयापैकी 2 मेट्रिक टन कचऱयावर या ठिकाणी प्रक्रिया केली जाईल. यासाठी 90 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. ‘सीएसआर’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जाईल. यासाठी ‘बायोमिथेनायझेशन’ तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.
  • पालिकेच्या वीजनिर्मिती प्रकल्पात निर्माण होणाऱया विजेपैकी 180 युनिट वीज सोबतच्या मार्गावरील दिव्यांसाठी वापरली जाणार आहे. तर प्रकल्पासाठी उर्वरित विजेचा वापर केला जाणार असल्याचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे 2 मेट्रिक टन कचरा वाहून नेण्याचा खर्च वाचणार असून पर्यावरणदृष्टय़ा प्रकल्प फायदेशीर ठरणार असल्याचे गायकवाड म्हणाले.

मुंबईतील कचरा घटला

कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी कचऱयाचे वर्गीकरण, ओल्या कचऱयापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱयाची किल्हेवाट, टाकाऊ पाण्याचा पुनर्कापर किंवा पर्जन्य जल संधारण योजना राबविणाऱया सोसायटय़ा-आस्थापनांना करात सूट देण्यात येत आहे. यामध्ये उगमस्थानी ओल्या कचऱयापासून खतनिर्मिती आणि सुक्या कचऱयाचे वर्गिकरण यासाठी मालमत्ता करामधील सर्वसाधारण करात 10 टक्के सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी दररोजचे सात ते साडेसात हजार मेट्रिक टनांपर्यंत असणारे कचऱयाचे प्रमाण आता साडेपाच ते सहा हजार मेट्रिक टनांपर्यंत खाली आले आहे.