
मुंबई मालाड येथील 21 वर्षीय तरुणीला आडोशाला नेत तिच्यावर जबरदस्ती करणाऱया आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला. आयपीसी कलम 375 नुसार स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिच्या खाजगी भागात बोट घालणे हा एकप्रकारे बलात्कार असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने मालाड येथील आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर आरोपीचे अपीलही फेटाळून लावले.
घटना घडल्यानंतर पीडितेने तात्काळ तक्रार दाखल केली व दुसऱया दिवशीच पोलिसांनी आरोपीला अटक केली तसेच आरोपीच्या या कृत्यामुळे मुलीला इजा झाली असून पुरावे पाहता आरोपीला दिलासा देता येणार नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळून लावला.































































