मुंबईकरांनो, ओळखपत्र खिशात असेल तरच घराबाहेर पडा!

लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसादही मिळतोय

ओळखपत्र खिशात घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका. अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते. मुंबई पोलिसांनी दोन किलोमीटरच्या परिघातच नागरिकांना खरेदीसाठी जाता येईल असे बंधन घातले होते. परंतु ते हटवण्यात आले असून घराबाहेर प्रवास करताना ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगा अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

पोलिसांनी ट्विटरवरून मुंबईकरांना ही माहिती दिली आहे. दोन किलोमीटरची मर्यादा हटवली गेली असली तरी पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंतच घराबाहेर पडता येणार आहे. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंतचा नाईट कर्फ्यु कायम ठेवण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक प्रवासच त्या कालावधीत करता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या