Mumbai News – दर अर्ध्या तासाला विमान उडवून देऊ! मुंबई विमानतळाला धमकीचा मेल

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दर अर्ध्या तासाला विमान उडवून देण्याची धमकी मेलमध्ये देण्यात आली आहे. मुंबई विमानतळ पोलिसांच्या मेल आयडीवर हा ईमेल आला आहे. या मेलनंतर सुरक्षा यंञणा अलर्ट मोडवर आल्या असून विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

स्फोटकं निष्क्रिय करून बॉम्बस्फोट रोखण्यासाठी 10 दशलक्ष डॉलर्लची मागणी मेल करणाऱ्या व्यक्तीने केली आहे. जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनीला जाणाऱ्या विमानात स्फोटके ठेवण्यात आली असून दर अर्ध्या तासाला विमान उडवून देऊ, असे मेलमध्ये म्हटले आहे. मुंबई पोलीस अधिक तपास करत असून मेल पाठवणाऱ्याचाही शोध घेत आहेत.