जोगेश्वरीत घरगुती सिलिंडरचा साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांताक्रूझ (पूर्व) येथील उपनिबंधक शिधावाटप (ड परिमंडळ) कार्यालयाच्या पथकाने जोगेश्वरी पूर्व परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा साठा जप्त केला. लजीज शिक कबाब हॉटेलमध्ये घरगुती वापराचे गॅस सिलिंडर साठवून त्याचा व्यावसायिक वापर केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कायदेशीर कारवाई करून शिधावाटप अधिकारी हरीश पटेल यांनी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. या प्रकरणात वाहिद अमीन अत्तार याला अटक केली. सहाय्यक नियंत्रक अश्विन रोहिणीकर यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपनियंत्रक भास्कर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शिधावाटप विभागाने गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.