मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील बेकायदा झोपडय़ा हटवल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसला बेकायदा झोपडय़ांचा विळखा पडला होता. विद्यापीठाच्या नॅनोटेक्नॉलॉजी इमारतीमागील जमिनीवर या झोपडय़ा पसरल्या आहेत. या झोपडय़ांबद्दल युवा सेनेचे सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून विद्यापीठाने आज त्या झोपडय़ा हटवल्या.

28 सप्टेंबर 2018 रोजीच वैभव थोरात यांनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. कुळकर्णी यांच्याकडे या झोपडय़ांबाबत तक्रार केली होती. त्या झोपडय़ा प्रत्यक्ष दाखवल्याही होत्या. त्यांची छायाचित्रेही दिली होती. मात्र तातडीच्या कारवाईचे आश्वासन देऊनही गेली पाच वर्षे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. थोरात यांनी काही दिवसांपूर्वीच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पुन्हा त्यासंदर्भात तक्रार करून तातडीच्या कारवाईची मागणी केली होती. संबंधित बेकायदा झोपडय़ा हटवल्यामुळे मोकळी झालेली जागा विद्यापीठाला शैक्षणिक उपक्रमासाठी वापरता येऊ शकणार आहे.