लवकरच लोकल सर्वसामान्यांसाठी खुली होण्याचे संकेत

मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या 95 टक्के लोकल फेऱया शुक्रवार 29 जानेवारीपासून रुळांवर आणण्याची घोषणा केली आहे. दोन्ही रेल्वेच्या मिळून 204 अतिरिक्त फेऱया धावणार असल्याने सध्या सुरू असलेल्या एकूण लोकल फेऱयांची संख्या 2781 वरून 2985 इतकी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल फेऱया सुरू करण्याची ही पूर्व तयारी मानली जात असून लवकरच सर्वांना लोकलमधून प्रवास करता येणार असल्याचे म्हटले जात आहे.

महापौरांचे सूतोवाच

कोरोना नियंत्रणात असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईकरांची जीवनवाहिनी लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. लोकलचे दरवाजे 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान सर्वसामान्यांसाठी खुले होतील, अशी शक्यता महापौरांनी वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या