
बुधवारी झालेल्या पावसाने मध्य रेल्वेची पुन्हा एकदा वाट लावली. या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही तासातच बंद पडली. बुधवारी दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास बंद पडलेली लोकल गाड्यांची सेवा आतापर्यंत पूर्ववत झालेली नाही. मध्य रेल्वेने एक ट्विट करून बुदारी रात्री 12 वाजेपर्यंत कुर्ला ते कल्याणदरम्यानची वाहतूक सुरू झाल्याची माहिती दिली आहे.
Flash:
At 0015 hrs Kurla-Kalyan services resumed.
At 0035 hrs CSMT-Goregaon services resumed.— Central Railway (@Central_Railway) September 4, 2019
सीएसटीपर्यंतची अप आणि डाऊन दिशेची लोकल गाड्यांची वाहतूक अजुनही सुरू झालेली नाही. ही वाहतूक सुरू केव्हा होणार याची माहिती मध्य रेल्वेने दिलेले नाही. रुळांवर पाणी साचल्याने आणि मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक बंद झाली होती. लोकल गाड्या नसल्याने घरी परतणाऱ्या नोकरदार वर्, विद्यार्थी, महिला, लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले. रस्त्यावरही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. टॅक्सीवाले मनमानी पद्धतीने भाडे वसूल करण्याचा प्रयत्न करत होते. बेस्टने ज्यादा बस सोडून दिलासा देण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रवाशांची संख्या इतकी जास्त होती की या बस सगळ्या प्रवाशांना वाहून नेण्यास असमर्थ ठरल्या.
























































