
सामना प्रतिनिधी। मुंबई
मुंबईच्या आकाशात सुमारे 32 हजार फूट उंचीवर दोन विमानांची टक्कर थोडक्यात टळली. पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्याने ही विमाने मुंबईच्या आकाशातून जात असताना हा प्रसंग ओढवला. एअर फ्रान्स आणि एतिहाद या विमाने एकाच वेळी समान हवाई मार्गावर आल्याने हा अपघात घडणार होता. मात्र हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या ही बाब लक्षात आल्याने मोठा अपघात
पाकिस्तानची हवाई हद्द विमानांच्या उड्डाणासाठी 27 फेबुवारीपासून बंद ठेवण्यात आली आहे. याचा ताण हिंदुस्थानच्या हवाई हद्दीवर येत आहेत. रविवारी व्हिएतनामहून पॅरिसला जाणारे ‘एअर फ्रान्स’ विमान कंपनीचे विमान आणि अबूधाबीहून काठमांडूला जाणारे ‘एतिहाद’ कंपनीचे विमान एकाच हवाई मार्गावर समोरा समोर आले होते. मात्र ही बाब मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ट्रॅफिक नियंत्रण कक्षाच्या निदर्शनास आली. त्यानंतर संबंधित वैमानिकांच्या ही बाब निदर्शनास आणून देऊन तत्काळ अलर्ट दिल्याने होणारा अपघात टळला. पाकिस्तानी हवाई हद्द बंद असल्याने अनेक विमाने हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत दाखल होत आहेत. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून ही बाब योग्य रीत्या हाताळली जात असली तरी अशी घटना घडणे दुदैवी असल्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या प्रवक्त्याने सांगितले.























































