
सामना ऑनलाईन। मुंबई
जयपूर एक्स्प्रेसच्या एका कोचमधील शौचालयात प्रवाशाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
शुक्रवारी सकाळी जयपूर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल स्थानकात आली. काही वेळानंतर एक्स्प्रेस स्वछ्तेकरता कारशेड मध्ये नेली जाणार होती. रेल्वेचा एक कर्मचारी हा तपासणीचे काम करत होता. तेव्हा एस 4 या कोच मधील शौचालयाचा दरवाजा बंद असल्याचे निदर्शनास आले. त्याने दरवाजा ठोकला मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर दरवाजा तोडला असता एक प्रवाशाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याची माहिती रेल्वे पोलिसांना कळवली. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.























































