चष्म्याची खरी गरज ‘मनसे’लाच! – महापौरांकडून स्टंटबाजीला चोख प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबईत पाणी तुंबल्याचे सांगत महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांना चष्मा भेट देणाऱया ‘मनसे’च्या स्टंटबाजीला महापौरांनी चोख प्रत्युत्तर दिले. ज्या दिवशी पाणी साचले नव्हते तेव्हा प्रसारमाध्यमांनी घेतलेला बाइट दाखवून अतिवृष्टीच्या दिवशी ‘मनसे’ने केलेली नौटंकी केवळ आपल्या बदनामीसाठी केलेला निरर्थक प्रयत्न असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.

मुंबईत 2 जुलैपासून पाऊस सुरू झाला. या दिवशी मुंबईत दिवसभर जनजीवन सुरळीत सुरू होते. मात्र याच दिवशी रात्रीपासून सुरू झालेली अतिवृष्टी आणि याच वेळी समुद्राला भरती असल्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मात्र पालिकेने सुसज्ज ठेवलेल्या यंत्रणेमुळे पाण्याचा निचरा वेगाने झाला. असे असतानाही मनसेने वृत्तवाहिन्यांवरील जुन्या बाइटचा सहारा घेत स्टंटबाजी केली होती.

मला ‘मनसे’ने पाठवलेली चष्म्याची भेट मिळाली. मात्र माझी दृष्टी चांगली आहे. सध्या चष्म्याची खरी गरज ‘मनसे’लाच आहे. कारण त्यांच्याकडे अजूनही दृष्टी नाही. प्रसारमाध्यमांनी कमी पाऊस असताना विचारलेल्या प्रश्नावर मी ‘तसे’ उत्तर दिले होते. मात्र हा बाइट अतिवृष्टीच्या दिवशी दाखवण्यात आला.-प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, महापौर