माँसाहेबांना आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा जयंती दिन म्हणजेच ममता दिन कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून गुरुवारी राज्यभरात साजरा करण्यात आला. शिवतीर्थ येथील माँसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी स्मृती स्मारक समितीचे सरचिटणीस रवींद्र वायकर, विश्वस्त विजय कदम, नगरसेवक बाळा नर, मंगेश सातमकर, माजी महापौर महादेव देवळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, प्रवीण पंडीत, जी. एस. परब, वामन भोसले आदी उपस्थित होते. माँसाहेबांच्या पुतळ्याभोवती मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.