
मेट्रोच्या कामासाठी 23 आणि 24 नोव्हेंबरला अंधेरी ते कांदिवली पश्चिमेकडचा परिसर अंधारात जाणार आहे. मेट्रो-2 अ प्रकल्पाच्या मार्गावर कामराज नगर येथे मोनो पोल उभारण्यात येणार असल्याने या परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) व्यक्त केली आहे.
23 आणि 24 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 पासून पहाटे 6 वाजेपर्यंत अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली परिसरातील वीजपुरवठा खंडित केला जाऊ शकतो. टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी पर्यायी यंत्रणा वापरून वीजपुरवठा अखंडित ठेवण्याची शाश्वती दिली आहे, परंतु अचानक काही अडचण निर्माण झाली तर वीज खंडित करावी लागेल अशी माहिती एमएमआरडीएचे सह प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली.

























































