
एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील गिरणी कामगारांसाठी राखीव असलेल्या ठाण्यातील रांजनोली, रायगड येथील रायचूर आणि सावो व्हिलेज (कोल्हे) येथील 2521 घरांची सोडत रखडली आहे. त्यामुळे गिरणी कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे. सध्या या घरांच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असून दुरुस्तीनंतर म्हाडामार्फत सोडत काढण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रायचूर, रांजनोली येथील 1244 आणि सावो व्हिलेज (कोल्हे) येथील 258 अशा 2521 घरांची सोडत अनेक वर्षे रखडली आहे. यासंदर्भात पंकज भुजबळ, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारला होता.





























































