मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 31 मेची डेडलाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील 26 जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळ उपसा प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. ट्रश बूमच्या सहाय्याने पाण्यावर तरंगणारा कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू आहेत. हा कचरा स्वच्छ झाल्यानंतर गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात येणार असून मेअखेरीपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने कंत्राटदारांना दिल्या आहेत.

पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत या मिठी नदीचे काम पूर्ण करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली होती. मात्र मिठी नदीच्या तीन भागांतील गाळ काढण्याच्या कामांसाठी मागवलेल्या निविदा प्रक्रियेत दोन कंपन्यांनी सहभाग नोंदवला. या दोनही कंपन्यांची निविदा तातडीने मंजूर करत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. महापालिका प्रशासनाकडून गाळ उपसासंदर्भात प्राप्त होणाऱया सर्व चित्रफितींचे एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जाणार आहे. गाळ काढण्याच्या प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला आहे.b