
मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा कोलमडलेली असतानाच भक्ती पार्क जवळ मोनो रेलमध्ये देखील बिघाड झाला आहे. मोनो रेल चक्क रुळावरून कलंडली त्यामुळे आतील प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली. तब्बल दीड तास दोनशे ते तीनशे प्रवासी मोनो रेलमध्ये अडकले होते. आता अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवले असून आता काही प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी अॅम्ब्युलन्स देखील तैनात असून काही प्रवाशांना त्रास झाल्याने रुग्णालयात नेल्याचे समजले.
मुसळधार पावसामुळे चेंबूरजवळ मोनो रेल रुळावरून कलंडली, तब्बल दीड तास प्रवासी मोनोरेलमध्ये अडकले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी काचा फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. pic.twitter.com/LCcmZNHufj
— Saamana Online (@SaamanaOnline) August 19, 2025
लोकलसेवा कोलमडलेली असल्याने आज प्रवाशांनी घरी जाण्यासाठी मेट्रो व मोनो रेलची वाट धरली होती. मोनो रेलची क्षमता 105 टनची असताना 109 टन प्रवासी मोनोरेलमध्ये चढले होते, अशी माहिती मोनोरेल प्रशासनाने दिली आहे.