सावधान! यंदा पावसाळ्यात वीस दिवस समुद्राला उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यावर्षी पावसाळ्यात जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये तब्बल २० दिवस मुंबईच्या किनार्‍यावर अतिउंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्राला उधाण येणार असल्याने मुंबईकरांनी सावधान रहावे असे आवाहन ज्येष्ठ खगोलअभ्यासक, पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी केले आहे. समुद्राला उधाण आलेल्या काळात अतिवृष्टी झाल्यास मुंबई-ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबई गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाशी लढा देत आहे. याच वेळी तोंडावर आलेल्या पावसाळ्यातही समुद्राला मोठी भरती येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच यावर्षी पाऊसही सरासरी गाठणार असल्याचे याआधीच स्पष्ट झाल्याने अतिवृष्टी झाल्यास समुद्र सपाटीपेक्षा खाली असलेल्या मुंबई, ठाण्यासारख्या शहरांतील अनेक भागांत पाणी तुंबण्याची शक्यता असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी म्हटले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ४ ते ९ जून आणि २३ व २४ जून, जुलैमध्ये ४ ते ७ तारीख, २१ ते २४ जुलै असे प्रत्येकी आठ दिवस आणि ऑगस्ट महिन्यात १९ ते २२ ऑगस्ट असे चार दिवस मिळून तब्बल २० दिवस उधाणाचे राहणार असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले आहे. या काळात मुंबईकर-पर्यटकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, सावधान रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जूनमधील उधाणाचे दिवस

  • गुरुवार ४ जून (सकाळी १०.५७) – पाण्याची उंची ४.५६ मीटर
  • शुक्रवार ५ जून (सकाळी ११.४५) – पाण्याची उंची ४.७५ मीटर
  • शनिवार ६ जून (दुपारी १२.३३) – पाण्याची उंची ४.८२ मीटर
  • रविवार ७ जून (दुपारी १.१९) – पाण्याची उंची ४.७८ मीटर
  • सोमवार ८ जून (दुपारी २.०४ ) – पाण्याची उंची ४.६७ मीटर
  • मंगळवार ९ जून (दुपारी २.४८) – पाण्याची उंची ४.५० मीटर
  • मंगळवार २३ जून (दुपारी १.४३) – पाण्याची उंची ४.५२ मीटर
  • बुधवार २४ जून (दुपारी २.२५) – पाण्याची उंची ४.५१ मीटर

जुलैमधील उधाणाचे दिवस

  • शनिवार ४ जुलै (सकाळी ११.३८) – पाण्याची उंची ४.५७मीटर
  • रविवार ५ जुलै (दुपारी १२.२३) – पाण्याची उंची ४.६३मीटर.
  • सोमवार ६ जुलै (दुपारी १.०६) – पाण्याची उंची ४.६२ मीटर
  • मंगळवार ७ जुलै (दुपारी १.४६) – पाण्याची उंची ४.५४ मीटर
  • मंगळवार २१ जुलै (दुपारी १२.४३) – पाण्याची उंची ४.५४ मीटर
  • बुधवार २२ जुलै (दुपारी १.२२) – पाण्याची उंची ४.६३ मीटर
  • गुरुवार २३ जुलै (दुपारी २.०३) – पाण्याची उंची ४.६६ मीटर
  • शुक्रवार २४ जुलै (दुपारी २.४५) – पाण्याची उंची ४.६१ मीटर

ऑगस्टमधील उधाणाचे दिवस

  • बुधवार १९ ऑगस्ट (दुपारी १२.१७) – पाण्याची उंची ४.६१ मीटर
  • गुरुवार २० ऑगस्ट (दुपारी १२.५५) -पाण्याची उंची ४.७३ मीटर
  • शुक्रवार २१ ऑगस्ट (दुपारी १.३३) -पाण्याची उंची ४.७५ मीटर
  • शनिवार २२ ऑगस्ट (दुपारी २.१४)- पाण्याची उंची ४.६७ मीटर