मूर्तिकारांना हवी महापालिका शाळेत जागा,  नियमावली प्रतीक्षेत मुंबईतील मूर्तिकार

423

अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर सध्या कोरोनाचे सावट पसरले आहे. त्याचा थेट फटका मुंबईतील मूर्तिकार मंडळींना बसला असून जुलै महिना उजाडला तरी अद्याप चित्रशाळांना परकानगी न मिळाल्याने त्यांच्यासमोर चिंतेचे ढग पसरले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने लककरात लककर मूर्तिकारांसाठी नियमाकली जाहीर करताना सध्या बंद असलेल्या मुंबईतील महापालिका शाळेत चित्रशाळा सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता मूर्तिकारांकडून करण्यात येत आहे.

मुंबईत मोठय़ा जल्लोषात सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. यासाठी मेच्या अखेरीसच मुंबईतील लालबाग, परळ, काळाचौकी आणि पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी गणेश चित्रशाळांची लगबग सुरू होते. यंदा मात्र जुलै उजाडला तरी अद्याप याठिकाणी गणेश चित्रशाळा सुरू झालेल्या नाहीत. दरवर्षी या काळात गणेशभक्तांना आवडणारी गणेशमूर्ती निवडण्यासाठी या चित्रशाळा जूनमध्येच हाऊसफुल होऊन जातात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अनिश्चिततेचे सावट पसरले असल्याने अद्याप प्रशासनाने गणेशचित्र शाळांना परकानगी दिलेली नाही. त्यामुळे मुंबईतील मूर्तिकारांची चिंता काढली आहे. अद्याप चित्रशाळा सुरू न झाल्याने त्यांच्या हाती पुरेसा वेळ नसल्याची खंत अनेक मूर्तिकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. गणेशोत्सव आणि नकरात्रोत्सव वगळता या मूर्तिकारांकडे कमाईचे साधन नसल्याने त्यांच्या चिंतेत आता भर पडली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने लवकरात लवकर चित्रशाळांसाठी नियमावली जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, अनेक मूर्तिकारांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचेदेखील आश्वासन दिले आहे. चित्रशाळेत गर्दी होणार नाही याची दखल घेतली जाईल, यासाठी अनेक उपाययोजनादेखील करण्यात येणार आहेत. ज्यात गणेशभक्तांना प्रामुख्याने मास्क बंधनकारक करणे, हॅण्ड सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग तसेच  इतर गोष्टींचा समावेश असणार आहे.

काय आहे मूर्तिकारांचे मत
यासंदर्भात मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार संतोष कांबळी म्हणाले की, मूर्तिकारांसमोर सध्या दुहेरी संकट आले आहे. अद्याप चित्रशाळांना परकानगी दिलेली नाही. त्यामुळे मूर्ती घडकायच्या कशा असा प्रश्न आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीकर सुरक्षितता महत्काची आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने मूर्तिकार आपली कार्यशाळा सुरू करण्यास तयार आहेत. त्याउलट सध्या मुंबई महानगरपालिकेच्या बंद असलेल्या पालिका शाळेत मूर्तिकारांना परकागी दिल्यास त्याचा फायदा मूर्तिकारांना आणि महापालिका दोघांना होईल. याठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना राबकिण्यासाठी मदत होईल, त्याशिवाय मूर्तिकारांनादेखील त्याचा फायदा होईल, असे मत कांबळी यांनी यावेळी व्यक्त केले.

– जुलै महिना उलटला तरी अद्याप मूर्तिकारांना चित्रशाळांसाठी परवानगी नाही
– चित्रशाळेत होणारी गर्दी टाळण्यासाठी कूपन्स सिस्टिम राबविणार
– यंदा शाडूच्या मूर्तींच्या मागणीत वाढ झाली असून उपलब्ध कालावधी लक्षात घेता नियमावली जाहीर करावी
– गर्दी टाळण्यासाठी मूर्तीची निवड करताना कुटुंबातील एकाला देणार प्रवेश

आपली प्रतिक्रिया द्या