
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, प्रारूप मतदार यादीबाबत हरकती व सूचना सादर करण्यासाठी आता कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच हरकती व सूचना देताना पुरावा सादर करण्याचीही गरज नाही. पालिकेचे संबंधित प्राधिकृत अधिकारी स्वतःहून दखल घेऊन प्रशासकीय यंत्रणेद्वारा शहानिशा करून याबाबत यथोचित निर्णय घेतील.
पालिकेच्या https://www.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर ‘सूचना व अद्यतने’ या टॅब अंतर्गत ‘निवडणूक प्रभागांच्या मतदार यादीत आपले नाव शोधा’ ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर जाऊन मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधता येईल. तसेच, मतदारांच्या सोईसाठी महानगरपालिका मुख्यालय तसेच 24 प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांमध्ये मतदार सहायता पेंद्र (हेल्प डेस्क) सुरू करण्यात येत आहेत. दरम्यान, संभाव्य दुबार मतदारांबाबतही प्रत्येक सहायता पेंद्रात माहिती देण्यात येईल. तसेच, दुबार मतदारांशी निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून संवाद साधला जाईल. तथापि, मतदार पेंद्रनिहाय यादी तयार होईपर्यंत दुबार मतदारांबाबतची विहित प्रक्रिया केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.

























































