
मध्य रेल्वेने लोकलच्या प्रवाशांच्या सोईसाठी नवीन 332 एटीव्हीएम खरेदीची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यापैकी 248 एटीव्हीएम मुंबई विभागात बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे तिकीट मिळविण्याची सुविधा अधिक जलद बनणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अलीकडेच एम-यूटीएस (मोबाईल अनारक्षित तिकीट प्रणाली) सहाय्यक योजना सुरू झाली आहे. यात प्रशिक्षित एम-यूटीएस सहाय्यक मोबाईल पह्न आणि ब्लूटूथ-सक्षम प्रिंटरच्या साहाय्याने बुकिंग काउंटरजवळ तसेच प्रवाशांची वर्दळ असलेल्या परिसरात अनारक्षित तिकीट देत आहेत. त्यामुळे तिकीट खिडक्यांपुढील रांगा कमी झाल्या आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 88 स्थानकांवर 803 एटीव्हीएम उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त 332 नवीन एटीव्हीएम खरेदीची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यापैकी 248 एटीव्हीएम मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवर बसविण्यात येणार आहेत.
एम–यूटीएस सहाय्यक योजनेतून तीन महिन्यांत 1.97 लाखांहून अधिक प्रवाशांनी तिकिटे मिळवली. नव्या उपक्रमांतर्गत नोव्हेंबरमध्ये 37,267 तिकिटे, डिसेंबरमध्ये 49,167 तिकिटे आणि जानेवारी महिन्यात 50,306 तिकिटे जारी करण्यात आली.




























































