
कुर्ला नेहरूनगर येथे पल्लवी फाउंडेशनच्या वतीने रविवारी आयोजित ‘बाल जल्लोष’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बालगोपाळांसाठी हा कार्यक्रम आनंदाची पर्वणीच ठरला.
पल्लवी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगावकर व विश्वस्त शलाका कोरगावकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी या उत्सवाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. माया परिहार, हेनकेल कंपनीचे संदीप पेटकर, निलेश कोरगावकर, पल्लवी पुजारी, हेमंत काळे, विशाखा परब, संतोष चिकणे, शुभांगी मेमाने आदी यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत 995 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. केजी गटात सेविका, पहिली ते दुसरी गटात कृष्णा घोडके, तिसरी ते चौथी गटात ओवी गमरे, पाचवी ते सातवी गटात तनिषा बोभाटे, आठवी ते दहावी गटात सोनम बनसोडे यांनी बाजी मारली.
दुपारी मुलांना ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट दाखवण्यात आला. सायंकाळी पाणीपुरी, भेळपुरी, चाट, पॉपकॉर्न, आईस्क्रीमची दुकाने सजली होती. तसेच मैदानात वॉटर रायडिंग, जंपिंग जपांग, क्रिकेट, ट्रेन रायडिंग, बुल रायडिंग आदी खेळण्यांचा मुलांनी मनसोक्त आनंद घेतला.






























































