
मुंबईजवळ समुद्रात मासेमारी बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. या बोटीत किती खलाशी होते याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. गेट वे ऑफ इंडिया व नेवल डॉकच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नौदल आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिक मच्छिमार आणि पोलीसही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झाले.
बोटीच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर बोट गुजरातच्या वेरावल मासेमारी करणारी असल्याची माहिती मिळते. अपघातग्रस्त बोटीचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येल्लो गेट पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आणि रायगड पोलीस सतर्क झाले आहेत.