
ज्या देवीच्या नावावरून प्रभादेवी परिसराला प्रभादेवी हे नाव पडले, त्या प्रभावती मातेच्या जत्रोत्सवाला पौष पौर्णिमा अर्थात शापंभरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरुवात झाली आहे. 11 जानेवारीपर्यंत हा जत्रोत्सव सुरू राहणार असून यानिमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि हार-फुलांची सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला आहे. यात्रेच्या कालावधीत देवीच्या दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी दूरवरून भाविक येतात. या पार्श्वभूमीवर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.































































