
ईडीने राजकीय हेतूने विरोधात कारवाई होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी आरोपपत्र दाखल करत ईडीने रोहित पवार यांच्यावर मनी लाँडरिंग आरोप केला. मात्र पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दखल करून ही ईडीकडून आरोप पात्र दाखल करण्यात आलं आहे, मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीने कारखाने विकल्याचा आरोप ईडीकडून आरोपपत्रात करण्यात आला आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना रोहित पवार असं म्हणाले आहेत.
आज पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार म्हणाले आहेत की, “50.2 कोटी रुपयांना बारामती अॅग्रोने हे टेंडर घेतलं. 100 लोकांची नावे यात घेतली होती. यात अनेक लोक होती. ईडीने जी एफआयआर दाखल केली यात 97 लोकांची नावे आहेत. नाबार्डने जो रिपोर्ट केला होता, त्यात माझ्या एकट्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न ईडीच्या माध्यमातून झाला. हा प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातूनच झाला आहे.” ही लढाई आपण जिंकणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.