Mumbai News – तांत्रिक बिघाडामुळे बोरीवली स्थानकाजवळ पश्चिम रेल्वे विस्कळीत; प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तांत्रिक बिघाडामुळे बोरीवली स्थानकाजवळ पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. अनेक उपनगरीय गाड्या विलंबाने सुरू होत्या. यामुळे नोकरदार वर्गाला सर्वाधिक फटका बसला असून कार्यालयात पोहचायला उशीर झाला.

तांत्रिक बिघाडामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 10 ते 20 मिनिटे विलंबाने धावत होत्या. यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. याबाबत प्रवाशांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. आधीच पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे लोकलला विलंब होणे ही नित्याची बाब झाली आहे. त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली. रेल्वे प्रशासनाने अद्याप तांत्रिक बिघाडाचे सविस्तर स्पष्टीकरण दिले नाही.