
कुर्ला वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष मधुसूदन सदडेकर, उपाध्यक्ष रवी संसारे, दीपा समीर हिरडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वृत्तपत्र वितरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी सुनील म्हापणकर, कार्याध्यक्ष अजय उतेकर, खजिनदार महेश शिरोडे यांनी परिश्रम घेतले. अजय उतेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

























































