अडीच वर्षांनंतर मोठा दिलासा, मुंबई धोक्याबाहेर; एकही कोरोना रुग्ण गंभीर नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनाच्या दहशतीखाली असणाऱ्या मुंबईची आज धोक्यातून सुटका झाली आहे. मुंबईत सद्यस्थितीत 948 कोरोनाबाधित असले तरी 93 टक्के बाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून एकाही बाधिताची प्रकृती अत्यवस्थ नाही. गंभीर रुग्ण नसल्याने मुंबईसाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.

 मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या यशस्वी लढय़ामुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले आहे. मात्र जूनअखेर मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढ सुरू झाली होती.  गणेशोत्सवाच्या सुरुवातीला झालेल्या रुग्णवाढीमुळे 28 सप्टेंबरदरम्यान सात हजार दिवसांवर गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी थेट 988 दिवसांवर आला होता. मात्र सद्यस्थितीत मुंबईत दररोज पाच ते सहा हजार कोरोना चाचण्या होत असताना सुमारे 100 ते 150 कोरोनाबाधित आढळत आहेत.

ई विभाग भायखळा

आणि सी विभाग सॅण्डहर्स्ट रोड भाग कोरोनामुक्त झाला आहे. भायखळय़ात केवळ आठ कोरोनाबाधित तर सॅण्डहर्स्ट विभागात केवळ एक कोरोनाबाधित आहे.

मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड

  • आतापर्यंत आढळलेले रुग्ण – 11 लाख 51 हजार 776
  • कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या – 11 लाख 31 हजार 091
  • कोरानामुळे मृत्यू झालेले रुग्ण – 19 हजार 737
  • सध्याची कोरोना वाढ – 0.011 टक्के