इंधनाचा भडका: पेट्रोल 90, डिझेल 79

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे संकट असताना आता पेट्रोल डिझेल दरवाढीचा पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. राज्यातील 19 जिह्यांमध्ये पेट्रोलने 90 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर डिझेलचा दरही 79 रुपये 66 पैशांवर गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी पेट्रोलचे दर सरासरी 15 ते 17 पैशांनी वाढले होते. आज पुन्हा त्यात वाढ झाली आहे. मुंबईत डिझेलची किंमत 24 पैशांनी वाढली आहे. आता डिझेलचा दर 79 रुपये 66 पैशांच्या आसपास आहे, तर पेट्रोलचे दर सुमारे 19 पैशांनी वाढले आहेत.

परभणीत सर्वाधिक दर

नागपूर, परभणी, नांदेड, सोलापूर, अमरावती, संभाजीनगर आणि बुलढाणा येथे डिझेलची किंमत प्रति लिटर 80 रुपयांच्या वर गेली आहे. परभणीत पेट्रोल दर सर्वाधिक 91 रुपये 95 पैसे आहे.