
पवई पूर्व येथून मुंबईला पाणीपुरवठा होण्यासाठी असलेली तानसा पाइपलाइन फुटल्याने आज हजारो लिटर पाणी वाहून वाया गेले आहे. सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या पाइपलाइनची दुरुस्ती पालिकेने तातडीने सुरू केली आहे. मात्र या घटनेमुळे मरोळ, चकाला, तरुण भारत सोसायटी, बामणपाडा, चिमटपाडा आणि मालपा डोंगरी भागातील पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



























































