मुंबईतील प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर 10 रुपयांवरून थेट 50 रुपयांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड 19 चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकांतील प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर सध्याच्या रु. 10/- वरून रु. 50/- करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात प्लॅटफॉर्म / स्टेशन /कॉन्कोर्स आणि टर्मिनसवर जास्त गर्दी रोखण्यासाठी हे केले गेले आहे.