हा व्हिडीओ बघाल तर तुम्हीही म्हणाल ‘मुंबई पोलीस झिंदाबाद’

1594
फोटो प्रातिनिधीक

संकटकाळात पोलीस मदतीला धावून येतात, त्यात मुंबई पोलीस हे नाव अग्रस्थानी आहे. कोरोनाच्या संकटात मुंबई पोलीस त्याच तत्परतेने काम करताना दिसत आहेत. प्रवासी मजुरांना याचा अनुभव आला असून त्यांनी ‘मुंबई पोलीस झिंदाबाद’ अशा घोषणा देत जयजयकार केला आहे. त्यावेळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुंबईहून पश्चिम बंगालसाठी सुटलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनच्या मागे रेल्वे स्थानकावर पोलीस अधिकारी धावताना दिसले. या गाडीने त्यांच्या घरी जाणारे काही कामगार रेल्वे सुटण्याच्या काही मिनिटांतच स्टेशनवर पोहोचले. अशा परिस्थितीत या प्रवासी मजुरांसाठी रेल्वे थांबविण्यासाठी हे पोलिस ट्रेनच्या मागे धावले. ट्रेन तात्काळ थांबवणे गरजेचे होते त्यामुळे हे अधिकारी ट्रेनच्या मागे धावले.

कोरोनाव्हायरस लॉकडाउन दरम्यान परप्रांत कामगार, पर्यटक, विद्यार्थी आणि इतरांना त्यांच्या घरी परत आणण्यासाठी श्रमिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. या घटनेचा व्हिडिओ मुंबईतील एका ग्रुपने शेअर केला आहे. हा ग्रुप या कठीण काळात बर्‍याच लोकांची भूक मिटवत आहे. या ग्रुपने केलेल्या पोस्टनुसार काही प्रवासी मजूर स्टेशनवर उशिरा आले आणि पश्चिम बंगालसाठी शेवटची ट्रेन सुटली तेव्हा ही घटना घडली.

गाडी डोळ्यासमोर सुटल्याने प्रवासी रडकुंडीला आले होते, ट्रेन पकडण्यासाठी लांबूनच धावत सुटल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिले. त्यांनी गाडी प्लॅटफॉर्म सोडण्याआधी धावत पाठलाग केला आणि गार्डला गाडी थांबवण्याची विनंती केली. गार्डने गाडी थांबवली. प्रवाशांना गाडीत चढवून दिले, त्यामुळे उशीर झालेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या प्रवाशांनी आणि त्यांना सोडण्यासाठी स्टेशनवर आलेल्या मंडळींनी मुंबई पोलीस झिंदाबाद अशा घोषणा देत आभार मानले व पोलिसांचा उत्साह वाढवला.

आपली प्रतिक्रिया द्या