
माहिती व तंत्रज्ञानाची मदत घेऊन मुंबई वाहतूक पोलीस आणखीच हायटेक होणार आहेत. शहरातील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱयावर लक्ष ठेवले जाईल. शहरात एखाद्या ठिकाणी वाहन अपघात झाल्यास त्याची माहिती ड्रोनद्वारे पोलीस नियंत्रण कक्षाला सहज मिळेल.
मुंबईत सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे जाळे आहे. गल्लीबोळापासून ते महामार्गावर दिवसाला साधारण लाखो वाहने ये-जा करत असतात. शहरात वाहतूककोंडीचे प्रकार होऊ नयेत याची खबरदारी वाहतूक पोलीस घेतात. बेशिस्त चालकावर वाहतूक पोलीस कारवाई करत असतात. नवीन वर्षात वाहतूक पोलिसांनी हायटेक होण्याचा संकल्प केला आहे.
शहरातील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस ड्रोनचा वापर करणार आहेत. गृह विभागाच्या माध्यमातून 12 नवीन ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी 6 ड्रोनच्या खरेदीची प्रकिया सुरु असून उवरित 6 ड्रोनची खरेदी लवकरच केली जाणार आहे. ड्रोनद्वारे वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे एक युनिट तयार केले जाणार असल्याचे गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
आयटीएमएस प्रकल्प ठरेल महत्त्वाचा
नवीन वर्षात मुंबईत इंटिग्रेटेड ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) हा प्रकल्प सुरू करण्याचा विचार आहे. रस्त्याच्या लांबीनुसार वाहनांची संख्या निश्चित करून प्रत्यक्षपणे सिग्नल यंत्रणेत आवश्यकतेनुसार बदल करणे शक्य होईल. या प्रकल्पामुळे लायसन्स नंबरप्लेट ओळख, चोरीची वाहने शोधण्यास आणि दंड वसुली करण्यास मदत होणार आहे.
नवीन वर्षात वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात पंधरा हजार स्वयंसेवकाची फौज असेल
वाहतूक पोलिसांच्या सर/मॅडम उपक्रमाला चांगला प्रतिसाद




























































