मुंबई-ठाण्यात वीज ‘कोसळली’.. रेल्वे थांबली, चाकरमान्यांचे हाल… पंखे थांबले, घराघरांत बेहाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे ऑक्टोबर हीटमुळे कावलेल्या मुंबई-ठाणेकरांना सोमवारी सकाळीच विजेने जोरदार शॉक दिला. 10 च्या सुमारास मुंबई-ठाण्यासह पार पनवेल-रायगडपर्यंत अचानक वीज गेली आणि अवघा व्यवहारच थांबला. सकाळीच जणू वीज ‘कोसळली’… रेल्वे जागच्या जागी थांबल्या, रस्त्यांवरील सिग्नलही बंद पडले. वर्प फ्रॉम होम आणि वर्प फ्रॉम ऑफिस दोघांचेही शटडाऊन झाले. ऑक्टोबरच्या काहिलीत मुंबई-ठाणेकर अक्षरशः अधिकच घामाघूम झाले. तब्बल साडेतीन तासांनंतर सर्व ठिकाणी टप्प्याटप्याने वीजपुरवठा सुरळीत झाला. महापारेषणच्या 400 केव्ही कळवा-पडघा जीआयएस वीज केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे परिसराला पुरवल्या जाणाऱया तब्बल 2200 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाल्याचे निदान करण्यात आले.

central-raiolway-local-service-no-electricity

मुंबई आणि परिसराला कळवा-पडघा जीआयएस केंद्रातून वीज पुरवठा केला जातो. त्यासाठी येथे दोन सर्पिट आहेत. सोमवारी पहाटे सर्पिट एकमधून वीज पुरवठा सुरु असतानाच जादा व्होल्टेजमुळे वाहिनी बंद झाली होती. त्यामुळे त्याचा भार सर्पिट दोनवर टाकला होता. त्यानुसार वीज पुरवठा सुरू असतानाच सकाळी दहा वाजता यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रेल्वेसह बेस्ट, टाटा, अदानी आणि महावितरणच्या ग्राहकांना बत्ती गुलचा सामना करावा लागला. आधीच ऑक्टोबर हीट सुरू असतानाच बत्ती गुल झाल्याने मुंबईकरांचा पुरता घामटा निघाला.

medical-shop-no-electricity

वीज खंडित झाल्याने सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार, युवा सेनेची मागणी मान्य

मुंबईत सोमवारी तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने रेल्वेसेवाही खंडित झाली. परिणामी अनेक विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा हुकली. अशा विद्यार्थ्यांची 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी राज्याचे मंत्री, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि शीतल देवरुखकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आण सीईटी सेलकडे तातडीने केली. त्या मागणीची दखल घेऊन पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी त्यासंदर्भात सीईटी सेलला मेल पाठवून कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

petrol-pump-no-electricity

लोकल ठप्प झाल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची लटकंती

मुंबईला होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी चालवल्या जाणाऱया मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल गाडय़ांना करकचून ब्रेक लागला होता. गाडी का थांबली आहे, पुढे कधी जाणार याबाबतची कोणतीच उद्घोषणा वीज नसल्याने होत नव्हती. त्यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला. अनेकांनी ट्रकमध्ये उतरून पायपीट करत कामाचे ठिकाण गाठले. त्यानंतर दोन तासानंतर बाराच्या सुमारास पश्चिम रेल्वेची तर मध्य रेल्वेची 12 वाजून 20 मिनिटांनी लोकल सेवा सुरू झाली.

church-gate-6-vaidya

लांब पल्ल्याच्या ट्रेनवरही परिणाम

मध्य रेल्वेच्या एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-थिरूवंनतपुरम, एलटीटी-दरभंगा, एलटीटी-वाराणशी गाडय़ा तर पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस-अमृतसर स्पेशल, वांद्रे टर्मिनस ते अमृतसर पश्चिम एक्सप्रेस, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्नावती एक्प्रेस, सयाजी नागरी एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस ते जोधपूर सुर्यनगरी एक्सप्रेस या गाडय़ांच्या वेळा बदलण्यात आल्या तर काही मुंबईत येण्याआधीच त्यांची सेवा समाप्त करण्यात आली.

cst-station-no-electricity

ऑनलाइन परीक्षेलाही फटका

खंडित झालेल्या वीज पुरवठय़ाचा ऑनलाइन परीक्षेलाही फटका बसला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचा पेपर सकाळी 11 ते 12 या वेळेत ऑनलाइन होणार होता. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना हा पेपर देता आला नाही. विद्यापीठाने त्याची दखल घेतली असून ज्या विद्यार्थ्याना परीक्षा देणे शक्य झाले नाही त्यांची परीक्षा नंतर घेतली जाईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. तर आज परीक्षा देऊन न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या घेतली जाणार असल्याचे संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे.

शीव रुग्णालयातील शस्त्रक्रिया लांबणीवर

मुंबईत आज वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका पालिकेच्या शीव रुग्णालयाला बसला. या रुग्णालयातील 6 पैकी 4 शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागल्या तसेच हाडाच्या 8 पैकी 6, न्युरोसर्जरीच्या दोन, डोळ्यांच्या 5 पैकी 2 तर मूत्रपिंडाशी संबंधित 8 पैकी 2 शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या. मात्र, ‘ईएनटी’च्या दोन्ही शस्त्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण झाल्या, अशी माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. दरम्यान, नायर आणि केईएम रुग्णालयातील शस्त्रक्रियांवर कोणताही विपरित परिणाम झाला नाही.

अदानीच्या आयलँडिंग सिस्टममुळे रुग्णालयांना वीजपुरवठा

महापारेषणच्या वीज वहन नेटवर्पमध्ये बिघाड होऊन मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतरही अत्यावश्यक सेवेत मोडणाऱया रुग्णालयांचा वीज पुरवठा सुरळीत होता. काळव्याहून मुंबईत येणारा वीज पुरवठा ठप्प झाल्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीने आपल्या आयलँडिंग सिस्टमच्या माध्यमातून वितरण यंत्रणा वेगळी करून डहाणू वीज केंद्रातून मिळणारी वीज अत्यावश्यक सेवे अंतर्गत येणारी रुग्णालये आणि पश्चिम उपनगरातील काही भागात वीज पुरवठा सुरु ठेवला होता असे अदानी इलेक्ट्रिसिटीने स्पष्ट
केले आहे.

केंद्रीय पथक मुंबईला येणार

राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नेतृत्वात केंद्रीय अधिकाऱयांचे पथक मुंबईला भेट देणार असून अशा प्रकारच्या आपत्तींचे कारण शोधून काढून त्यावर शक्य असलेल्या सर्व उपायांबाबत हे पथक राज्य सरकारला मार्गदर्शन करणार आहे, असे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी सांगितले. मुंबईमधील आज खंडित झालेला वीजपुरवठा मोठय़ा प्रमाणात पूर्ववत करण्यात आला आहे. 2000 मेगावॉट पेक्षा जास्त पुरवठा खंडित झाला होता, आता जवळपास सर्वच वीज पुरवठा सुरु झाला आहे. उर्वरित पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत केला जाईल, असेही आर. के. सिंग म्हणाले.

वीज पुरवठा का बंद झाला?

1. मुंबईला वीज पुरवठा करणाऱया महत्त्वाच्या चार 400 केव्ही वीजवाहिन्या आहेत. या चारही वाहिन्या 400 केव्ही कळवा उपकेंद्र येथे येतात व तेथून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला वीज वितरित केली जाते. तसेच टाटा आणि अदानी यांचे एकत्रित 1800 मेगावॅट वीजनिर्मितीद्वारे वीजपुरवठा केला जातो.

2. त्या चार वाहिन्यांपैकी 400 के. व्ही. कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजून 47 मिनिटाला या वाहिनीचा कंडक्टर तुटल्यामुळे बंद झाली होती. तसेच झालेला बिघाड हा सह्याद्री रांगांच्या माथ्यावरील दुर्गम भागात असल्याने तेथे काम करणे अत्यंत खडतर असे असले तरीही तेथे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

3. 400 के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-1 ही 12 ऑक्टोबरला पहाटे 4 वाजून 33 मिनिटाला ओव्हर व्होल्टेजमुळे बंद पडली. तसेच या वाहिनीचे बाधित इन्सुलेटर बदलण्याचे काम चालू होते. तरीही मुंबईतील वीजनिर्मितीद्वारे व उर्वरित दोन वाहिन्यांच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत सुरू होता.

4. परंतु, सकाळी 10 वाजून 1 मिनिटांनी 400 के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-2 तांत्रिक बिघाड झाल्याने बंद झाली आणि मुंबईची वीजव्यवस्था आयलँडिंगवर गेली. त्याच वेळेस टाटा पॉवरचे 500 मेगावॅट आणि अदानीचे 250 मे.वॅ.चे डहाणू येथील वीजनिर्मिती संच बंद झाल्यामुळे मुंबईतील वीज पुरवठा बाधित झाला.

मुंबईतील पाणीपुरवठा आज दुपारपर्यंत सुरळीत होणार

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामावर त्याचा प्रतिपूल परिणाम झाला. त्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. मात्र, वीजपुरवठा पूर्ववत झाला असला तरी मंगळवार, 13 ऑक्टोबरला दुपारपर्यंत मुंबईच्या सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.