
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई-पुणे प्रवास करणाऱयांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले. या प्रकल्पास ’मिसिंग लिंक’ म्हटले जातेय, पण हे नाव बदला, मिसिंग लिंक नाही तर ’कनेक्टिटिंग लिंक’ नाव द्या, कारण, नथिंग इज मिसिंग असे म्हणत फडणवीसांनी या प्रकल्पास ‘कनेक्टींग’ लिंक असे नवे नाव दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचे यावेळी कौतुक केले. ते म्हणाले की, ‘हा केबल-स्टे पूल आंतरराष्ट्रीय इंजिनिअरींगचा उत्पृष्ट नमुना आहे. या प्रकल्पात एपूण सात देशांचा सहभाग होता. पुलाचे डिझाइन पॅनडामध्ये तयार करण्यात आले, तर काही महत्त्वाच्या चाचण्या डेन्मार्पमध्ये पार पडल्या. केबलचे उत्पादन मलेशियामध्ये झाले, अग्निशमन सुरक्षेच्या चाचण्या स्पेनने केल्या, पुलाचे आलेखन तैवानमध्ये करण्यात आले, आणि केबल तज्ञ सिंगापूरमधून सहभागी झाले होते.’ निसर्ग चक्रीवादळाचा वेग ताशी 130 किमी होता, मात्र हा पूल ताशी 240 किमी वेगाच्या वायांनाही तोंड देण्याइतका सक्षम आहे, असे ते म्हणाले. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास 30 मिनिटांनी कमी होणार आहे.
गिनीज बुकमध्ये नोंद
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विश्वविक्रम नोंद झाला. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेका@र्डच्या प्रतिनिधींनी याबाबतच्या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.



























































