पाऊस कधीचा पडतो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्हा आणि भिवंडीतही मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर होता. भिवंडीत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.मुंबईत गेल्या 24 तासांत सांताक्रुझमध्ये 51.8 मीमी तर कुलाब्यात 38 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली. नाशिकमध्ये मंगळवारी दुसऱया दिवशीही गोदावरीला पूर आला. पुढील 2 दिवस मुंबईसह उपनगरात, ठाणे आणि पालघर जिह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

येत्या 24 तासांत महाराष्ट्राच्या किनारी भागात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

मुंबईत मंगळवारी दिवसभरात एकूण 71.76 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

मुठा नदी भरून वाहू लागली
पुण्यातील मुठा नदी भरून वाहू लागली. खडकवासला धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुसळधार पावसामुळे पौड फाटा, कर्वे रस्ता आणि सावरकर उड्डाणपुलावर वाहतूककोंडी झाली.

24 तासांतील पाऊस (मिमी)
मुंबई शहर          20.43
पूर्व उपनगरे        44.68
पश्चिम उपनगरे    35.75

कोकणात नद्यांना पूर मुंबई-गोवा महामार्ग

रत्नागिरी – वादळी वाऱयासह मुसळधार पावसाने रत्नागिरी जिह्यात हाहाकार उडवला. चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर हे तालुके जलमय झाले. चिपळूण, राजापूर शहर आणि रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेला पुराने वेढा घातला. वशिष्ठा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बहादूरशेख नाक्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सिंधुदुर्ग जिल्हय़ात तिलारी धरण क्षेत्रात पाणी वाढल्याने विसर्ग सुरू झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली तर गगन बावडय़ातील मांडकुली किरवे दरम्यान पाणी भरल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली.

अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडताच मंगळवारी पुन्हा राजापूर शहरातील जवाहर चौक जलमय झाला. वशिष्ठा नदी आणि शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडताच चिपळूण बाजारपेठेला पुराने वेढा घातला. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता बहादूरशेख पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला.