लसीकरणासाठी मुंबई सज्ज; 762 मास्टर ट्रेनर, 2500 पालिका कर्मचाऱ्य़ांचे प्रशिक्षण पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लसींवर संशोधन अंतिम टप्प्यात असून ब्रिटनने मॉडर्ना व्हॅक्सिनला लसीकरणाची परवानगीही दिली आहे. हिंदुस्थानातही कोरोना लसीवरील संशोधन अंतिम टप्प्यात असून त्या दृष्टीने गेल्या 14 दिवसांत मुंबई महानगरपालिकेने 762 मास्टर ट्रेनर तयार केले असून त्यांनी आतापर्यंत 2500 कर्मचाऱयांना प्रशिक्षित केले आहे.

लसीकरणासाठी आणखी प्रशिक्षित मनुष्यबळ लागले तर त्याची तयारीही पालिकेने केली आहे. लसीकरण पाच टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात सवा लाख डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या ‘चेस द व्हायरस, ‘मिशन झीरो’ यासह राज्य सरकारची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला मोठे यश येत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्याही हजारच्या आत येत असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही 93 टक्क्यांवर पोहोचले आहे. मृत्यूदरही कमी झाला असून स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. अशी वेळी कोरोनावरील विविध पंपन्यांच्या तीन लसींची अंतिम चाचणी देशभरात सुरू आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईही अंतिम टप्प्यात आली असून पेंद्र सरकारने लस पुरवल्यानंतर आता केवळ लसीकरणाची प्रक्रिया राबवली जाणे बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरण तातडीने पार पडावे यासाठी  महानगरपालिकेने 18 डिसेंबरपासून जी/उत्तर वॉर्डमधील धारावीपासून लसीकरण प्रशिक्षण सुरू केले होते. अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक वॉर्डमध्ये देण्यात आल्याची अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

कांजुरचे कोल्ड स्टोरेज 10 जानेवारीपर्यंत पूर्ण

मुंबईकरांना देण्यात येणाऱया लसींचा साठा कांजुरमार्ग येथील कोल्ड स्टोरेजमध्ये केला जाणार असून त्यासाठी 5 हजार चौरस फुटांच्या संपूर्ण एक मजल्यावर ही व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी तयार करण्यात येत असलेल्या स्टोरेजचे काम 10 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे.

एकाच वेळी सुमारे 15 लाख लसींचा साठा इथे करता येणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

लसीकरण प्रशिक्षण असे पार पडले!

गेल्या 14 दिवसांच्या प्रशिक्षणात पहिल्या टप्प्यात लसीकरण कसे करावे, काय काय काळजी घ्यावी तसेच ओळख कशी पटवावी याची माहिती डॉक्टर्स, आरोग्यसेवकांना, पालिका कर्मचाऱयांना दिली गेली, तर दुसऱया टप्प्यात पेंद्र सरकारने विकसित केलेल्या ‘कोविन अॅप’मध्ये व्यक्तीची माहिती कशी भरावी आणि त्याचा कसा वापर करावा याची माहिती देण्यात आली. मात्र लसीकरण मुंबईतील 8 रुग्णालयांत केले जाणार आहे.

ब्रिटनच्या नवीन कोरोनाचे चार रुग्ण वाढले

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा आणखी चार जणांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे देशात नवीन कोरोनाग्रस्तांची संख्या 29 झाली आहे. ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनचा संसर्ग 70 टक्के जास्त वेगाने होतो. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी हिंदुस्थानसह जगभरातील अनेक देशांनी ब्रिटनबरोबरची विमानसेवा बंद केली. मात्र, 23 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली गेली. पॉझिटिव्ह रुग्णांच्या चाचणीचे नमुने पुण्यातील ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत 29 जणांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झाला आहे. या सर्व रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. नवीन स्ट्रेनचे सर्वाधिक आठ रुग्ण दिल्लीतील आहेत.