आरपीएफ जवानाने पाठलाग करून मोबाईल चोराला पकडले

330
crime

चालत्या लोकलमधून प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या एका चोरट्यास आरपीएफच्या जवानाने पाठलाग करीत पकडल्याची घटना रविवारी मुंब्रा रेल्वे स्थानकात घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. 2 वर रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आरपीएफचे कॉन्स्टेबल विवेक कटियार गस्त घालत असताना त्यांना एक प्रवासी चालत्या लोकलमधून संशयास्पदरीत्या उतरना दिसला. त्यानंतर प्रवाशांच्या मदतीसाठीचा पुकारा ऐकून कटियार यांनी कल्याण दिशेने पळालेल्या चोरटय़ाचा पाठलाग केला आणि आरोपीला पकडून मुंब्रा आरपीएफच्या कार्यालयात नेले. चौकशीत आरोपीचे नाव अफजल शेख (21) असे समजले असून त्यांच्याकडून 12 हजार रुपयांचा विवोचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. ज्या व्यक्तीचा मोबाईल चोरला ते कळव्याचे रहिवासी असून ते मुंबई वाहतूक पोलीस शाखेचे कर्मचारी असल्याचे उघड झाले. अखेर त्यांनी ओळख पटवून त्यांचा मोबाईल त्यांना सुखरूपपणे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या