
कोविडचा संसर्ग कमी होत असल्यामुळे राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातील शाळांचे दरवाजे 17 ऑगस्टपासून पुन्हा उघडणार आहेत. मागील दीड वर्षापासून ऑनलाइन वर्ग सुरू होते, पण मुलांना शाळांकडे वळवण्यासाठी आता ‘चला मुलांनो, शाळेत चला’ ही मोहीम राबवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. कोविड प्रतिबंधक सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर आणि एका वर्गात फक्त 15 ते 20 विद्यार्थी बसवण्याची सूचना जारी केली आहे.
पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती
महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चारजणांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समितीमध्ये वॉर्ड ऑफिसर, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व शिक्षण अधिकारी सदस्य असतील.
n विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळा दोन सत्रांत होतील. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असतील. दोन बाकांध्ये सहा फूट अंतर ठेवावे लागणार आहे.
n विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नाही. पूर्णपणे पालकांच्या संमतीवर उपस्थिती अवलंबून असेल.
n शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो शाळेच्याच शहरात किंवा गावात करावी. शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये.
n देशातील सहा ते नऊ वयोगटातील 57. 2 टक्के विद्यार्थ्यांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत.






























































