मुंबईतील शाळा 18 जानेवारीपासून? नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणातून अभ्यासाचे धडे गिरविणाऱ्या मुंबईतील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच शाळा- कॉलेजची दारे खुली होणार आहेत. शाळा सुरू करण्यासाठी मुंबई महापालिका शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली असून 18 जानेवारीपासून प्रत्यक्ष वर्ग भरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात 15 जानेवारीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे.

16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर 18 तारखेपासून शाळा सुरू होण्याची शक्यता वाढल्याचे पालिका शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. निर्णय झाल्यावर सर्व शाळा एकाच दिवशी सुरू होणार आहेत. मार्चपासून बंद असलेल्या शाळा क्वारंटाईन सेंटरसाठी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. अशा शाळाही आता अभ्यासासाठी सज्ज झाल्या आहेत. शाळा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागामार्फत आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

मुंबई विभागात नववी ते बारावीच्या एकूण शाळा – 1411

48 अनुदानित, 163 विनाअनुदानित,

1200 खासगी महापालिकेची तयारी

–  शाळांना थर्मामीटर, ऑक्सीमीटर, साबण उपलब्ध करून देणार.

–  17 जानेवारीपर्यंत सर्व शाळांमध्ये मास्कचे वाटप.

–  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगबरोबरच विद्यार्थी-शिक्षकांच्या आरोग्यासाठी नियमांची अंमलबजावणी.