मुंबईत 75 लाखांची रोकड जप्त

33

सामना प्रतिनिधी । मुंबई

शहरात तीन वेगवेगळय़ा ठिकाणी तब्बल 75 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या फिरत्या पथकाने ही कारवाई केली. एस.व्ही.पी. परिसरातील गोल देऊळ परिसरात ह्युंदाई आय 20 या कारची तपासणी करण्यात आली.

या कारमध्ये दहा लाखांची रक्कम आढळली. प्रदीप निसार, शांतीलाल निसार आणि महेश गाला हे तिघे त्या कारमध्ये होते. भायखळय़ात बी. जे. रोडवर तांबट नाका परिसरात ओला कारमधून 49 लाख 98 हजार 500 रुपयांची रोकड आढळून आली, तर भायखळय़ातच राणीबागेजवळ इको स्पोर्टस् कारमधून 15 लाख रुपये ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या