
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) 2020मध्ये घेतलेल्या केंद्रीय प्रशासकीय सेवा परीक्षेत मुंबई आयआयटीच्या शुभम कुमारने देशातून पहिला येत मुंबईची शान वाढवली आहे. आयआयटीतून सिव्हिल अभियांत्रिकीत बी. टेक झालेल्या आणि मूळचा बिहारचा असलेल्या शुभमने परीक्षेत देशात पहिला येण्याचा बहुमान मिळवला आहे.
महाराष्ट्रातील मृणालिनी देसाई ही 25 वी आली आहे तर बार्टी प्रशिक्षण केंद्रातील 9 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या केंद्रीय परीक्षेत यशस्वी होण्याचा मान देशभरातून 761 उमेदवारांनी मिळवला आहे. त्यात 545 पुरुष तर 216 महिला उमेदवार आहेत.
































































