एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीत आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
st bus
फाईल फोटो

वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याची जुलै 2019 च्या वेतनापासून थकबाकीसह अंमलबजावणी करावी आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱयांप्रमाणे 12,500 रुपयांची सण उचल मिळावी, अन्यथा येत्या 25 ऑक्टोबर रोजी ऐन दिवाळीच्या सणात राज्यभर निदर्शने करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला आहे.

कामगार कराराच्या तरतुदीनुसार राज्य सरकारने जाहीर केलेला वाढीव 3 टक्के महागाई भत्ता जुलै 2019 च्या वेतनापासून लागू करण्याची मागणी पूर्ण न झाल्याने तसेच राज्य सरकारच्या वर्ग 3 व 4 कर्मचाऱयांप्रमाणे एसटी कामगारांनाही 12,500 सण उचल द्यावी या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.