राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा कऱण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये १ लाख रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे असून नाटक विभागासाठी रवी पटवर्धन, कंठसंगीतासाठी, माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगितासाठी . श्याम देशपांडे, मराठी चित्रपटासाठी उषा नाईक, कीर्तनासाठी ह.भ.प.विनोदबुवा खोंड, शाहिरीसाठी शाहीर विजय जगताप, नृत्यासाठी माणिकबाई रेंडके, आदिवासी गिरीजनसाठी वेणू बुकले, वाद्यसंगीतासाठी पं.प्रभाकर धाकडे, तमाशासाठी श्रीमती चंद्राबाई अण्णा आवळे, लोककलेसाठी मोहन कदम आणि कलादानसाठी श्रीकांत धोंगडे यांना हा पुरस्कार जाहिर झालेला आहे. पुरस्कार प्राप्त कलाकारांचे सांस्कृतिक कार्य मंत्री, विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना प्रतिवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 1976 पासून या पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री, विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीने 2018 च्या पुरस्कारांसाठी खालील मान्यवरांची शिफारस केली होती.