
सामना प्रतिनिधी। मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना आता घरबसल्या पदवी प्रमाणपत्र घेता येणार आहे. मागील सहा वर्षांमधील 11 लाख पदव्यांचा तपशील पडताळणीसाठी विद्यापीठाने ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. ही सोय विद्यापीठाने नॅशनल ऍकॅडमिक डिपॉझिटरी (नॅड ) या केंद्र सरकारच्या डिजिटल पोर्टलच्या सहकार्याने उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांने नॅड पोर्टलवर नोंदणी केल्यानंतरच ही सेवा उपलब्ध होणार आहे.
ऑनलाईन सेवेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभिलेखाची पडताळणी होणार असून यामुळे बोगस प्रमाणपत्राच्या प्रकरणांना आळा बसणार आहे. या सेवेसाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ( एनएसडीएल ) या संस्थेची नियुक्ती केली. विद्यापीठाने 2013 ते 2019 पर्यंतची सहा वर्षांतील 11 लाख विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती नॅडच्या ऑनलाईन पोर्टलकर उपलब्ध होईल.
नॅडवर नोंदणीसाठी विद्यापीठाच्या www.mu.ac.in या वेबसाईटकर ऑनलाईन नॅड रजिस्ट्रेशन ही लिंक उपलब्ध आहे.
या उपक्रमाची माहिती देण्यासाठी एनएसडीएलचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील हे जिह्यानिहाय प्राचार्यांच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे निर्देश देत आहेत.
2019 चा शाखानिहाय पदवीचा तपशील
मानक्य विद्याशाखा- 24,282
विज्ञान व तंत्रज्ञान
विद्याशाखा- 54,980
वाणिज्य व व्यवस्थापन
विद्याशाखा-1,06,724
आंतरविद्याशाखा – 7,603
एकूण – 1,93,589
वर्षनिहाय उपलब्ध पदवीचा तपशील
2014 -1,93,398
2015 -1,85,467
2016 – 1,61,914
2017- 1,68,743
2018 -1,89,538
2019 – 1,93,589
एकूण -10,92,649
देशातील तसेच विदेशातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभिलेखाची पडताळणी ऑनलाईन स्वरूपात तात्काळ करण्याची सुविधा आता उपलब्ध आहे. यापुढे विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी करावी. असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले आहे.






























































